News Flash

समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

रक्षाबंधनासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या अनमोल संदल (२२) या तरुणाचा मृतदेह जुहू समुद्रकिनाऱ्यावर सापडला. सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

| August 14, 2014 12:01 pm

रक्षाबंधनासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या अनमोल संदल (२२) या तरुणाचा मृतदेह  जुहू समुद्रकिनाऱ्यावर सापडला.  सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अनमोल मूळचा दिल्लीचा राहणारा होता. गेल्या शुक्रवारी तो रक्षाबंधनानिमित्त आपल्या भावासह मालाड येथे राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. नंतर तो मंगळवारी ओशिवरा येथील काकांकडे गेला होता. पण तो परतला नव्हता. त्याच्या कुटुंबीयांनी मग रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छदेनासाठी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2014 12:01 pm

Web Title: youth drowns to death at sea
टॅग : Sea
Next Stories
1 १२३ तालुके टंचाईग्रस्त
2 बालहट्टाला सरकारचा आधार
3 दहिहंडीवरुन कळव्यात धार्मिक चिथावणीला ऊत
Just Now!
X