News Flash

दुचाकी घसरून तरुणीचा मृत्यू

मैत्रिणीसह फिरायला निघालेल्या तरुणाची दुचाकी सोमवारी डी. बी. मार्ग परिसरात पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरून घसरल्याने तरुणीचा मृत्यू ओढवला असून त्यात तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे.

| June 19, 2013 03:02 am

मैत्रिणीसह फिरायला निघालेल्या तरुणाची दुचाकी सोमवारी डी. बी. मार्ग परिसरात पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरून घसरल्याने तरुणीचा मृत्यू ओढवला असून त्यात तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाविरोधात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुस्तफा मोहम्मद चरबीवाला हा १८ वर्षांचा तरुण आपली मैत्रिण अन्विक्षा गडोदिया (१८) हिला घेऊन अ‍ॅक्टिव्हा या गाडीवरून फिरायला चालला होता. तो बेदरकारपणे गाडी चालवत असावा, असा तर्क असून त्याचा गाडीवर ताबा राहिला नाही. पावसामुळे रस्ते आधीच ओले झाले असल्याने डी. बी. मार्ग येथील सगळे चौकाजवळील सारस्वत बँकेसमोर हे दोघे घसरून पडले. गाडीचा वेग जास्त असल्याने अन्विक्षाच्या पाठीला खरचटले व बरगडय़ांना दुखापत झाली.
अन्विक्षाला त्वरीत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी निसार अहमद कामदार यांनी मुस्तफाविरोधात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 3:02 am

Web Title: youth on bike death after bike sleep
Next Stories
1 बिल्डर्सना आकर्षित करण्यासाठी म्हाडाची नवीन योजना
2 कॉंग्रेस नेत्याच्या मुलाच्या भरधाव गाडीखाली चिरडून मुलीचा मृत्यू
3 कसाऱयाजवळ एलपीजी टॅंकर स्फोटात एक ठार
Just Now!
X