कल्याणमध्ये विद्यापीठ उपकेंद्राच्या आयोजीत कार्यक्रमात आज गोंधळ पहायला मिळाला. विद्यापीठाच्या कुलगुरूंचं भाषण सुरू होताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणाबाजी केली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यांच्यासमोरच ही घोषणाबाजी करण्यात आल्याने उपस्थित युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये व अभाविपच्या कार्यकर्त्यांमधेय वाद उद्भवला आणि यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 2:51 pm