मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला प्रतिबंध करण्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने कामा रुग्णालयामध्ये मियावाकी पद्धतीने तीन वर्षांमध्ये ३० हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर १० ते ११ हजार झाडे लावली आहेत. यामध्ये भारतीय पद्धतीची ४६ प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजन करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यामध्ये वृक्ष ही महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे कामा रुग्णालयामध्ये मियावाकी पद्धतीने तिसरे उद्यान उभारण्याचे काम १ मे २०२४ रोजी हाती घेण्यात आले.

हेही वाचा >>> ‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवणे गंभीर, लोकलचा विस्तार करण्याचे प्रवासी संघटनेचे मत

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
sharad pawar narendra modi (4)
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण

ग्रीनझप ग्रो फाऊंडेशनच्या माध्यमातून ८ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात येत आहे. यामध्ये अडुळसा, आवळा, दालचिनी, हिरडा, बदाम, फणस, कडीपत्ता, आंबा, कोकम, नागचाफा, करवंद, पिंपळ, शमी, सीता अशोक, सोनचाफा, सुपारी, तेजपत्ता, वड, रिठा, पारिजात, निरगुंडी अशी ४६ प्रजातींची देशी आणि आयुर्वेदिक गुण असलेली जवळपास २५०० झाडे लावण्यात आली आहेत. यापूर्वी कामा रुग्णालयात मियावाकी पद्धतीने दोन उद्याने उभारण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास साडे आठ हजार झाडे लावण्यात आली आहेत, अशी माहिती ग्रीनझप ग्रो फाऊंडेशनचे संचालक अरदीप राठोड यांनी दिली.

हेही वाचा >>> रेवस ते रेड्डी सागरी किनारा मार्ग, एमएसआरडीसीच्या दोन खाडीपूलाच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद

झाडांची निगा राखणे, खते घालणे, झाडांना दिवसांतून दोन वेळा पाणी घालणे, योग्य पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे, यासाठी विशेष माळीची व्यवस्था केली आहे. झाडांना घालणाऱ्या पाण्यांचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी झाडांभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे, अशी माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

दोन उद्यानांची माहिती पहिले मियावाकी उद्यान हे २०२० – २१ मध्ये उभारण्यात आले. यावेळी १५ हजार स्क्वेअर फूट जागेवर तब्बल ७०२६ झाडे लावली. दुसरे मियावाकी जंगल हे २०२२ मध्ये उभारण्यात आले असून, त्यामध्ये ७ हजार स्क्वेअर फूट जागेवर १५०० झाडे लावण्यात आली.