लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अवैधरित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहत असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना बोरिवली पोलिसांनी ऑक्टोबर २०२३ रोजी अटक केली होती. त्यांची चौकशी करून नालासोपारा, विरार, पुणे येथून आणखी १७ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन भारतीय दलालांचा समावेश आहे. अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने आठ महिने कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सुमन मोमीन सरदार उर्फ विश्वजित बाटुल मंडल (३१), ओमर फारुख मोल्ला उर्फ नासिर शाहजहान उद्दिन (२७) सलमान अयुब खान उर्फ अब्दुल सलाम आयुब मोडल (३४), अतिकुल अकिलुद्दीन मुल्ला (२३), सैदुल सफरअली गामन (२७) मुस्ताकअली कुतुबुद्दीन तरबदार (२२), फिरोज उलहक मोल्ला (२१), रहिम मोईद्दीन मंडल उर्फ रहिमुद्दीन मुल्ला (३२), रॉनी शफीकुल शेख उर्फ रशीद उलइस्माम मोनीर होलादार (२२) इनामुल कमल सरदार (२२), मसुद राणा इद्रीस गाझी (२२), रिपोन रोमेन ढाली (३४), मोनीरुल मोहमद मुल्ला (२५), आरीफ शौकत विश्वास (२५) मसुम बिल्ला अश्रफ मंडल (२५), दिलावर इद्रीस गाझी (२३), रब्बी कजल मंडल (२५), मुबीन जावेद मंडल उर्फ मुबीन सोईदुल इस्लाम (२६), सुजौन शोरीफउल शेख (२६), मिठु शोफीकुल शेख (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-राज्यात उष्माघाताचे रुग्ण २५० पार; जालना, नाशिक, बुलढाणामध्ये सर्वाधिक रुग्ण

बोरिवली पोलिसांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांन अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मुंबईत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या काही बांगलादेशी नागरिकांची नावे उघड झाली होती. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर नालासोपारा, विरार आणि पुणे येथून आणखी १७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

तसेच पुणे येथे बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या दोन दलालांनाही अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय पारपत्र, व्हीसा, जन्म प्रामाणपत्र, आधारकार्ड, पॅनकर्ड, मतदानकार्ड इत्यादी बनावट भारतीय कागदपत्रे सापडली. त्यानुसार बांगलादेशातून अवैधमार्गाने नागरिकांना भारतात आणून बनावट भारतीय कागदपत्रांद्वारे मध्य पूर्वेतील देशामध्ये पाठविणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने त्यांना आठ महिने कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास आणखी १६ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली.