उपक्रमात सहभागासाठी २७ सप्टेंबपर्यंत मुदत
ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून सध्या मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जात आहे. मात्र या वातावरणातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध कल्पना लढवीत काही भक्त या सणाचे पावित्र्य जपण्याचे कार्य करीत आहेत. अशा गणेशभक्तांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावर चालविलेल्या लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’तर्फे यंदाही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०१५’साठी ‘सॅन्सुई’ आणि ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे सहप्रायोजक आहेत. तसेच, ‘चितळे डेअरी’ यांची साथ स्पर्धेला आहे. पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी सजावटीचे छायाचित्र काढून पाठवायचे आहे.
ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागांत घेण्यात येणार असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक ९९९९ रुपयांचे आहे, तर द्वितीय पारितोषिक ६६६६ रुपयांचे आहे. विशेष पारितोषिक २००१ रुपयांचे असेल. रोख रकमेबरोबरच प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत दीड ते अकरा दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना सहभागी होता येईल.
स्पर्धेसाठी ‘पाच बाय सात’ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये २७ सप्टेंबपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकारली जातील. छायाचित्र व माहिती टपालाने, कुरिअरच्या माध्यमातून किंवा loksatta.ecoganesha@gmail.com या ई-मेलवर पाठविता येईल. मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर नसावा. छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी. छायचित्रे तिन्ही बाजूने वेगवेगळी घ्यावीत. प्रत्येक छायाचित्रांच्या सोबत स्पर्धकाचे नाव, घरचा पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, सजावटींसाठी वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी. स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क
’मुंबई- लोकसत्ता ब्रॅण्ड विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट. दूरध्वनी- ६७४४०३६९.
’ठाणे- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा. दूरध्वनी- २५३९९६०७.
’नाशिक- वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोज. मोबाइल- ९४२२२४५०६५.
’पुणे- रोहित कुलकर्णी, दी इंडियन एक्स्प्रेस लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजी नगर. दूरध्वनी- ०२०-६७२४१०००.
’औरंगाबाद- मुकुंद कानिटकर, १०३ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद-४३१००१. दूरध्वनी- ०२४०-२३४६३०३.
’अहमदनगर- संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर -४१४००१. मो.- ०९९२२४००९८१.
’ नागपूर- ज्ञानेश्वर महाले, वितरण विभाग, १९, ग्रेट नाग रोड, उंट खाना, वैद्यनाथ स्क्वेअरजवळ, नागपूर. दूरध्वनी- ०७१२-२७०६९२३, ९८२२७२०००९.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
d. gukesh
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची विदितवर मात
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी