मुंबई : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नागरी प्रश्नांबाबतच्या तक्रारी, विविध परवानग्या, करभरणा आदींसाठी रांगांमध्ये अडकण्याच्या फेऱ्यातून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे.

येत्या काळात मुंबईतील  मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० सेवासुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर एका संदेशाद्वारे मिळू शकणार आहेत. पालिकेने याकरिता व्हॉट्सअ‍ॅप कंपनीच्या सहकार्याने नवीन सुविधा विकसित केली आहे.    आता अनेक गोष्टींसाठी  नागरिकांना रांगा लावण्याची किंवा संकेतस्थळावरही जाण्याची गरज भासणार नाही. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ या सुविधेचे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

मकरसंक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी   नमूद केले. महापालिकेच्या ‘व्हॉट्अअ‍ॅप चॅट बॉट’मुळे संबंधितांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानगी, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक आदी माहिती सहज उपलब्ध होईल, असे डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे संचालक (सार्वजनिक धोरण) शिवनाथ ठुकराल यांनी मुंबई महापालिकेच्या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक केले. तसेच महापालिकेला सहकार्य करण्यास आम्ही सदैव तत्पर असू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महापालिकेशी संबंधित विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी यूपीआयआधारित ऑनलाइन सेवा, महापालिका व महापालिका क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडींची अद्ययावत माहिती, महापालिकेच्या विविध सेवा..सुविधांशी संबंधित प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादीविषयीची माहितीही येथे मिळू शकणार आहे.

अधिकाधिक  सुविधांसाठी..

मुंबईकर सध्या लहान-मोठय़ा वस्तूंची खरेदी- विक्री ही ऑनलाइन पद्धतीने करू लागले आहेत. तसेच लहानांपासून मोठय़ांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाच्याच मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असते व सर्वानाच त्याचा वापर करता येतो. त्यामुळे या अ‍ॅपचा वापर करून मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

तातडीने माहिती..

एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती उपलब्ध होते. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणाजवळ असणारे महापालिका दवाखाने, रुग्णालये, करोना केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटनस्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.

हे सारे कसे होईल?

मुंबईत एखाद्या व्यक्तीला उपलब्ध ८० सुविधांपैकी एखादी सेवा हवी असल्यास त्याने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या क्रमांकावर जावे. ती व्यक्ती २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या भागात आहे, त्यानुसार त्या विभागातील पालिका दवाखाने, मनपा शाळा, उद्याने, पर्यटनस्थळे अग्निशमन केंद्र या सर्वाची माहिती संपर्कयंत्रणा त्या व्यक्तीला उपलब्ध होऊ शकते.

हे नवे काय?

मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. येथे संदेशाद्वारे नागरिकांना विविध सेवा घेता येतील.

तक्रार आणि सूचनाही..

या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे. महापालिकेच्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधांशी संबंधित अर्ज करण्याची सुविधा आहे. तक्रारींचे निवारण या सेवेमुळे अत्यंत तातडीने होऊ शकेल.

कसे वापराल?

८९९९२२८९९९ या या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘ Namaste किंवा  Hil असा संदेश पाठविल्यानंतर महापालिकेच्या बोधचिन्हासहित अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे तीन पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर महापालिकेच्या सेवा, सुविधांशी संबंधित पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.