तत्कालीन अध्यक्षांसह २३ जणांवर गुन्हा

दादरच्या सेनापती बापट मार्गावर असलेल्या सीकेपी बँकेत तब्बल ८५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून, सन २०११-१२ या वर्षांदरम्यानचे अध्यक्ष विलास गुप्ते यांच्यासह संचालक मंडळातील २३ जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यमान सरकारमधील एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश असल्याचे बोलले जाते.

RBL Bank Fraud Case, 11 Including Senior Officers Booked, Rs 12 Crore Scam, rbl bank scam, rbl bank scam Rs 12 Crore , Senior Officers in RBL Bank scam, Mumbai news,
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
AAP Demand for action against officials who not provide information on website about proposals approved during cabinet meeting
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आयत्या वेळी मंजूर झालेल्या प्रस्तावांची माहिती गुलदस्त्यात… ‘आप’ने केली ‘ही’ मागणी

सीकेपी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने बँकेचे नियम धाब्यावर बसवत मनमानी कर्जवाटप केले होते. त्याचबरोबर कर्जवसुलीकडेही दुर्लक्ष केले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने सन २०११ मध्ये या बँकेच्या कारभाराची तपासणी केली असता अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने सीकेपी बँकेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जून २०१२मध्ये सहकार आयुक्तांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्त केला. भावेश अ‍ॅण्ड असोसिएट्स यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात बँकेचे ८५ कोटी ४९ लाख ८१ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आली. मात्र सनदी लेखापालाने या घोटाळ्यास जबाबदार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने सहकार आयुक्तांनी भावेश अ‍ॅण्ड असोसिएट्स यांना काळ्या यादीत टाकून पुढील कारवाई करण्याचे आदेश जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था मुंबई आर. सी. शहा यांना दिले होते. त्यानुसार शहा आणि विशेष लेखा परीक्षक प्रकाश मांढरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेत बँकेच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल केली. या गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्या तत्कालीनसंचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये विलास गुप्ते, हेमंत खारकर यांच्यासह एस. देशमुख, संजीवनी गुप्ते, शरद काळे, व्ही. देशमुख, प्रशांत पाटील, सुधीर देशपांडे, विजय वैद्य, सचिन जोशी, नागेश पवार, निनाद प्रधान, जयंत शिंदे, शंकरपाव देसाई, निशिकांत सुळे, संजीव देशपांडे, सुदेश खारकर, संतोष थोरात, विजय खारकर, मोहन आजगावकर, उमा पाटील आणि प्रशांत कंडलगावकर यांचा समावेश आहे.