scorecardresearch

मुंबई : वर्षाच्या अखेरीस घरविक्री स्थिरच; डिसेंबरमध्ये मुंबईत ९३६७ घरांची विक्री

करोनानंतर घरविक्रीत सातत्याने चढउतार दिसत आहेत. हेच चित्र २०२२ मध्ये कायम राहीले.

मुंबई : वर्षाच्या अखेरीस घरविक्री स्थिरच; डिसेंबरमध्ये मुंबईत ९३६७ घरांची विक्री
वर्षाच्या अखेरीस घरविक्री स्थिरच (संग्रहित छायाचित्र)

वर्षाअखेरीस, डिसेंबरमध्ये मुंबईतील घरविक्री वाढेल असे वाटत असताना प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात घरविक्री स्थिरच राहिली. डिसेंबरमध्ये मुंबईत ९३६७ घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला ८३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वर्षभरातील घरविक्रीचा आकडा १ लाख २२ हजारावर गेला आहे.

हेही वाचा- आशीष शेलार यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; स्वीय साहाय्यकाकडून तक्रार दाखल

करोना काळात आलेल्या मंदीतून मालमत्ता बाजारपेठ आता सावरत आहे. घरविक्रीत सातत्याने चढउतार दिसत आहेत. हेच चित्र २०२२ मध्ये कायम राहीले. या वर्षात केवळ चार महिन्यात घरविक्री दहा हजारांपेक्षा अधिक झाली. फेब्रुवारीत १०३७९, मार्चत १६७२६,एप्रिलमध्ये ११७१३, जुलैमध्ये ११३४० घरविक्री झाली. उर्वरित आठ महिन्यात ८ ते १० हजाराच्या आसपास विक्री झाली. सर्वात कमी (८१५५) घर विक्री जानेवारीत झाली असून त्यातून ४७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर सर्वाधिक (१६७२६) घरविक्री मार्चमध्ये झाली त्यातुन ११६० कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. २०२२ मध्ये मिळालेला हा महसूलही सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी, ४७८ कोटी रुपयांचा महसूल जानेवारीत मिळाला आहे.

हेही वाचा- वीज कंपन्यांची आयोगाकडे दरवाढीची मागणी; नवीन वर्षांत वीज महागणार

सरत्या वर्षात, २०२२ मध्ये एकूणच १ लाख २२ हजार घरांची विक्री झाली आहे. वर्षभरातील ही घरविक्री समाधानकारक मानली जात असली तरी यात वाढ होणे आणि बांधकाम व्यवसायला चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी मुद्रांक शुल्क दर कपात करणे गरजेचे आहे अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी पुन्हा उचलून धरली आहे.

हेही वाचा- स्वागत २०२३..; सरत्या वर्षांला जल्लोषात निरोप

वर्षभरातील मुंबईमधील घरविक्री आणि मुद्रांक शुल्क वसूली

महिना-घरविक्री-महसूल (कोटीत)

जानेवारी ८१५५-४७८

फेब्रुवारी १०३७९-६१४

मार्च- १६७२६-११६०

एप्रिल-११७१३-७३७

मे-९८३८-७२६

जून-९९१९-७३३

जुलै-११३४०-८२८

ऑगस्ट-८५५२-६४३

सप्टेंबर-८६२८-७३४

ऑक्टोबर-८४२१-७२३

नोव्हेंबर-८९६५-६८३

डिसेंबर-९३६७-८३५

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या