Premium

मुंबई : बनावट डॉक्टरांच्या टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक, चौकशीत ९ तक्रारदारांची माहिती उघड

युनानी डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली.

gang of fake doctors arrested
मुंबई : बनावट डॉक्टरांच्या टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक, चौकशीत ९ तक्रारदारांची माहिती उघड (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : युनानी डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला नव्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. संधीवातावर उपचार करण्याच्या नावाखाली आरोपींने टोळीने माटुंगा येथील ७७ वर्षीय व्यक्तीची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद शेरू शेख मकसूद खँ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (३९), मोहम्मद आसिफ मोह. निसार (२७) व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी राजस्थानमधील रहिवासी आहेत. युनानी डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांच्या घरी जाऊन उपचाराच्या बहाण्याने ही टोळी फसवणूक करीत होती. माटुंगा येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा संधीवात बरा करण्याच्या नावाखाली आरोपींनी साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली होती. महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सर्व आरोपींना बुधवारी गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा – मुंबई : कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस निलंबित

या टोळीने आतापर्यंत ९ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने वडाळा येथील रहिवासी राजेश पाटील यांची साडेचौदा लाख रुपयांची, मायरोस सालियन यांची २७ लाख रुपयांची, गेव मेस्त्री यांची १७ लाख रुपयांची, फिरोज सिंदवा यांची आठ लाख ५० हजार रुपयांची, आलिन मेहता यांची १० लाख रुपयांची, अरुण मेहता यांची तीन लाख २० हजार रुपयांची, महावीर जैन यांची एक लाख ६१ हजार रुपयांची, सुषमा वारोट यांची ९ लाख ४० हजार रुपयांची व प्रकाश नाईक यांची आठ लाख रुपयांची अशी एकूण एक कोटी रुपयांची फसवणूक या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – मुंबई : सायबर मदत क्रमांकामुळे ७९ लाख रुपये वाचवण्यात यश

आरोपींचे व्हॉट्सॲपवरील संभाषण व दूरध्वनीच्या माहितीवरून गुन्हे शाखेला आणखी काही तक्रारदारांची माहिती मिळाली आहे. त्यांनी आरोपींना ओळखले आहे. अटक आरोपींपैकी मोहम्मद शेरू हा सर्व तक्रारदारांच्या घरी डॉ. पटेल बनून गेला होता. याप्रकरणातील बहुसंख्य तक्रारदारांच्या शरिरातून पित्त काढण्याच्या नावाखाली अंगावर जखमा करू त्यावर छिद्र असलेल्या मेटल क्युबने (तुंबडी) रसायन टाकायचे. त्यावेळी तेथील रंग पिवळा झाल्याचे दाखवून पैसे उकळण्यात येत होते. दरम्यान, आरोपींच्या खात्यामधील ४ लाख रुपये गोठवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A gang of fake doctors arrested in new crimes mumabai print news ssb

First published on: 30-11-2023 at 21:42 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा