Premium

मुंबई : कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस निलंबित

कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या आरोपाखाली कांजूर मार्ग येथील पोलीस हवालदारावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली.

police drunk on duty mumbai
मुंबई : कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस निलंबित (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या आरोपाखाली कांजूर मार्ग येथील पोलीस हवालदारावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित पोलीस अधिकारी पोलिसांच्या मोबाइल व्हॅनवर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार रामचंद्र सरोदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सरोदे २३ नोव्हेंबर रोजी रात्रपाळीत कार्यरत होते. त्यावेळी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या मोबाइल व्हॅन क्रमांक १ वर ते तैनात होते. त्यांनी गणवेश परिधान केला होता. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले होते. या कृतीमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा

हेही वाचा – मुंबई : अमराठी पाट्या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम क्रमांक ३ अंतर्गत पोलीस उपायुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. याप्रकरणी चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. संबंधित आदेश सरोदे यांना सुपूर्द करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A police constable at kanjur marg was recently suspended on the charge of being drunk on duty mumbai print news ssb

First published on: 30-11-2023 at 21:22 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा