डोंबिवलीतील नवनीत नगर येथे सोमवारी संतोष वच्छीवार या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी पंकज सदय पाल (वय १८) या तरुणाला कल्याण न्यायालयाने १० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अन्य चार आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
पंकज हा बारावीत शिक्षण घेत आहे. सोमवारी संतोष आपल्या मैत्रिणीसह नवनीत नगर येथून घरी जात असताना तेथे बसलेल्या पाच तरुणांच्या टोळक्याने मैत्रिणीची छेड काढली. संतोषने त्यांना असे काही करू नका, असे सुरुवातीला समजावले. मात्र ते संतोषशी वाद घालू लागले. संतोषला या तरुणांनी बेदम मारहाण तर केलीच शिवाय त्याच्यावर चाकूने हल्लाही केला. त्यात तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. संतोषला वाचविण्यासाठी नवनीत नगरमधील रहिवासी जयंतीलाल छेडा (वय ५०) हे गृहस्थ धावले, पण टोळक्यातील तरुणांनी त्यांनाही मारहाण केली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
तरुणाला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
डोंबिवलीतील नवनीत नगर येथे सोमवारी संतोष वच्छीवार या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी पंकज सदय पाल (वय १८) या तरुणाला कल्याण न्यायालयाने १० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अन्य चार आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
First published on: 06-12-2012 at 05:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused youth given police custody upto10th december