कोणत्याही परवानग्या न घेता गोदामे उभारून त्यात रसायनांचा साठा करणाऱ्यांवर येत्या महिनाभरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
भिवंडीतील काल्हेर-राहनाळ परिसरात अनधिकृत गोदामांत रसायनांचा साठा केला जात असल्याबद्दल जगन्नाथ शेट्टी व अन्य सदस्यांनी प्रश्न मांडला होता. या परिसरात १० हजार गोदामे असून त्यापैकी अनेक अनधिकृत आहेत. ही गोदामे उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. तीन गोदामांवर छापा टाकून रसायनांचा साठा जप्त केला असून तिघांना अटक झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच येत्या महिनाभरात या गोदामांविरोधात व्यापक मोहीम रावबून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.