ऑनलाईन फसवणुकीचे असंख्य प्रकार अलिकडच्या काळात उघड झाले आहेत. ‘जमताडा’सारख्या वेबसीरिजच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीचा एक महत्त्वाचा पैलूही लोकांसमोर मांडण्यात आला आहे. ऑनलाईन फसवणुकीचे असे अनेक प्रकार घडत असताना त्याविषयी सातत्याने जनजागृती केली जात आहे. मात्र, तरीही हे प्रकार थांबत नसल्याचं नुकत्याच मुंबईत घडलेल्या एका प्रकरणावरून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फसवणूक झालेल्या ४० जणांमध्ये मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुंबईतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही समावेश आहे.

एक मेसेज, एक क्लिक आणि लाखोंचा गंडा!

यासंदर्भात पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. यामध्ये संबंधितांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो. या मेसेजमध्ये एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करून पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगितले जाते. यानंतर मोबईलवर एक फोन येतो. त्यावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगितले जाते आणि त्यातून लाखोंची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

काय आहे हा मेसेज?

यासंदर्भात अभिनेत्रीने दाखल तक्रारीनुसार फसवणूक झालेल्या लोकांना बँक अकाऊंट ब्लॉक झाल्याचा मेसेज पाठवला जातो. ‘Dear customer your Bank ACCOUNT has Been Blocked Today Please Update your PAN CARD’ असा हा मेसेज असून त्यासह एक लिंकदेखील पाठवली जाते. याच लिंकवर क्लिक करताच संबंधितांच्या खात्यामधील रक्कम सफाचट केली जात असल्याचं समोर आलं आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

मालिका विश्वामध्ये सुपरिचित असलेली अभिनेत्री श्वेता मेनन हिची अशा प्रकारे फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. श्वेता मेनननं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “पैसे गमावल्यानंतर मला त्यापासून बचावाबाबत समजलं आहे. सुदैवाने मी गमावलेली रक्कम लाखोंमध्ये नाही. फसवणूक करणाऱ्याने मला मेसेज पाठवला होता. त्या लिंकवर मी क्लिक केल्यानंतर माझे बँकिंग डिटेल त्याच्याकडे गेले. तिथे मी दोन वेळा ओटीपी, माझा पॅन कार्ड नंबर, नेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर माझ्या खात्यातून ५७ हजार ६०० रुपयांची रक्कम काढून घेण्यात आल्याचं माझ्या लक्षात आलं”, असं श्वेता मेनन हिने सांगितलं आहे.

“समोरच्या व्यक्तीने फोन करून माझ्याकडून ओटीपी आणि पासवर्ड मागून घेतले. या व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचं मला सांगितलं. मला फोनवरच या व्यक्तीने आलेला ओटीपी टाकायला सांगितला. त्यानं मला बोलण्यात गुंगवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मला तेव्हा काहीतरी संशय आला. जसे माझ्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे दोन मेसेज मला आले, मी लगेच कॉल बंद केला”, असंही श्वेता मेनन हिने सांगितलं.

एकूण ४० जणांना अशा प्रकारे फसवण्यात आलेलं असून हा आकडा लाखो रुपयांच्या घरात जातो. फसवणूक झालेले सर्व तक्रारदार एकाच बँकेचे खातेदार असल्याचंही सांगितलं जात आहे.

सायबर पोलिसांचं आवाहन

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. कोणतीही बँक किंवा अर्थपुरवठा संस्था यांना खातेधारकांकडून बँक डिटेल्स किंवा पासवर्ड मागण्याचा अधिकार नाही. दुर्दैवाने सुशिक्षित नागरिकही अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुकीला बळी पडून लाखो रुपये गमावत आहेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.