शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य अजित पवारांच्या जिव्हारी लागले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि बाळासाहेबांच्या मैत्रीची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला.
उद्धव यांचा हिंदुत्वाचा पुकार
अजितदादा म्हणाले, “बाळासाहेब आणि शरद पवारांची मैत्री लक्षात असू द्या, या वक्तव्याचा योग्य वेळी समाचार घेऊ” असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात शरद पवारांवर “थकलेला नवरा आणि सगळीकडे बाशिंग” असे वक्तव्य केले होते. या शाब्दिकयुद्धाला सुरूवात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत केली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. याला अनुसरून शरद पवारांनी उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग असे वक्तव्य केले होते. यावक्तव्याला उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात उत्तर दिले. रामाने जसा रावणाचा वध केला, तसाच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेले भ्रष्टाचाराचे रावण आपल्याला गाडून टाकायचे आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चौफेर हल्ला चढविला.
सरांना ‘दादर’ दाखवले!
देशाचे नेतृत्व करण्यासाठी मोदी समर्थ आहेत, असे सांगतानाच केंद्रातील यूपीएचे सरकार खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ अशी टीका शरद पवार यांनी मोदी यांच्यावर केली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, पवारांसारखा थकलेला नवरा हा सगळीकडेच बाशिंग बांधून बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून प्रत्येक ठिकाणी जागा अडवणाऱ्या पवारांनी आजपर्यंत काय काम ‘करून दाखविले’? मोदी यांच्यावर टीका करणारे पवार आपल्या ‘दिवटय़ा’ पुतण्याविषयी का बोलत नाहीत? असे टीकेचे सुर कालच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या मुखी होते.