Virat Kohli that helped Yash Dayal produce a magical comeback : रॉयल चॅलेंजर्स बंगलळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंतचा एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला आहे. शनिवारी (१८ मे) झालेला सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफ्समधील शेवटच्या स्थानासाठी अतिशय महत्त्वाचा होता, ज्यामध्ये आरसीबीने २७ धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफ्सचे तिकीट बुक केले. संघाच्या विजयात सर्व खेळाडूंचे मोलाचे योगदान होते. मात्र, यश दयालचे शेवटचे षटक सामन्याला कलाटणी देणार ठरले. या विजयानंतर यश दयालने मोहम्मद सिराजशी बोलताना आपल्या या कामगिरीचे श्रेय विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसला दिले.

२१९ धावांचा बचाव करताना आरसीबीसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या यश दयालचे योगदान विजयात महत्त्वाचे ठरले. त्याने शेवटच्या षटकात एका विकेटसह एकूण सात धावा दिल्या, ज्यामुळे सामन्यात आरसीबीचा विजय निश्चित झाला. हा तोच यश दयाल आहे, ज्याच्या मागील हंगामातील केकेआरविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सलग पाच षटकार मारले होते. ज्यामुळे यशची कारकीर्द जवळपास संपल्यात जमा झाली. आता तोच यश दयाल आरसीबीच्या विजयाचा तारणहार ठरला. अशा या शानदार कामगिरीनंतर दयालने कर्णधार फाफ डुप्लेक्सचे कौतुक केले. त्याबरोबर मागील हंगामातील झालेल्या खराब कामगिरीवर मात विराटकडून कशी मदत झाली, ते पण सांगितले.

विराटबद्दल यश काय म्हणाला?

विराट कोहलीबद्दल बोलताना यश दयाल म्हणाला, “आरसीबीने जेव्हा लिलावात माजी निवड केली, तेव्हा माझ्यावर बरीच टीका आणि चर्चा झाली होती. त्यामुळे मला त्यांना चुकीचे सिद्ध करायचे नव्हते. कारण मला स्वत:ला सिद्ध करायचे होते. ज्यामधून बाहेर पडण्यास विराट भैयाने मला मदत केली. मी जेव्हा आरसीबी संघात आलो, तेव्हा विराट भैयाने मला एक गोष्ट सांगितली होती.”

हेही वाचा – मैदानाबाहेरील गोष्टींचा कामगिरीवर परिणाम! मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक मार्क बाऊचरकडून हार्दिक पंड्याची पाठराखण

यश दयाल पुढे म्हणाला, “विराट भैया मला म्हणाला होता, की तू ज्या परिस्थितीतून जात आहेस, त्या परिस्थितीतून कधीकाळी मी पण गेलो आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्याची प्रोसेस सांगू शकतो. इथेच माझ्यावरचे निम्म ओझे कमी झाले. त्याचबरोबर देशांतर्गत खेळून आल्याने मला एक प्लॅटफॉर्म हवा होता, जो आरसीबीच्या रुपाने मिळाला. फॅफ एक उत्तम कर्णधार आहे. आमच्या संघात विराट भैय्या आणि फाफ आहेत, यामुळे सर्व तरुणांना दबावाच्या परिस्थितीत शांत राहण्यास मदत होते. ज्यामुळे शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करु शकलो.”

यश दयालच्या कामगिरीने प्लेसिस प्रभावित –

सामना संपल्यानंतर डुप्लेसिस म्हणाला की, “मला यश दयालला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायला आवडेल. त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ती अविश्वसनीय होती, त्याच्या या शानदार कामगिरीने श्रेय त्याच्या मेहनतीला जाते. वेगवान गोलंदाजी करणे हा नेहमीच चांगला पर्याय असतो आणि तुम्ही तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवावा आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या चेंडूवर यॉर्कर चालला नाही आणि त्यानंतर त्याने वेगात बदल केला आणि त्याला मदत मिळाली.”

हेही वाचा – RCB vs CSK : आरसीबी प्लेऑफ्समध्ये पोहोचल्यानंतर विराट-अनुष्का भावूक, डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचा VIDEO व्हायरल

शेवटच्या षटकात यश दयालची निर्णायक गोलंदाजी –

पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगवर जोरदार शॉट खेळला आणि ११० मीटरचा षटकार मारला. आता संघाला पाच चेंडूत ११ धावांची गरज होती, पण पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या हाती झेलबाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. आता सीएसके संघाला तीन चेंडूत ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. आता चेन्नईला प्लेऑप्समध्ये पात्र ठरण्यासाठी दोन चेंडूत १० धावांची गरज होती. जडेजा क्रीजवर स्ट्राइकवर होते. दयालने ओव्हरच्या शेवटचे दोन्ही चेंडू डॉट्स टाकले, ज्यामुळे आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.