Premium

‘इंडिया’ आघाडीत महिनाभरात जागावाटप; शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

राज्यातील लोकसभेच्या जागांचे वाटप कसे करायचे याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी सविस्तर चर्चा झाली.

sharad pawar house INDIA meeting
शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई : राज्यातील लोकसभेच्या जागांचे वाटप कसे करायचे याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी सविस्तर चर्चा झाली. ‘इंडिया’ या देशभरातील विरोधी पक्षांच्या आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीत बुधवारी होत असून या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात महाविकास आघाडीत  राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. जागावाटपासंदर्भात प्रादेशिक पक्षांची भूमिका कशी असावी. तसेच  दिल्लीत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत प्रादेशिक पक्ष म्हणून कोणते मुद्दे मांडायचे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. कोणाच्या वाटय़ाला नेमक्या किती जागा येणार.याविषयी देखील पवार-ठाकरे बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.  या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत प्रादेशिक पक्ष म्हणून कोणती भूमिका मांडायची. राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. लोकसभेच्या जागावाटपाचा कोणताही प्रश्न नाही. पुढील महिन्याभरात जागावाटपाची बोलणी पूर्ण होतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Allotment of seats in india aghadi within a month discussion between sharad pawar and uddhav thackeray ysh

First published on: 13-09-2023 at 00:07 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा