scorecardresearch

पोलीस उपायुक्त खंडणीप्रकरणी एकास अटक

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने लखनऊ येथे पप्पूकुमार प्यारेलाल गौड (२७) याला अटक केली आहे.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : खंडणीचे आरोप असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडिया व्यापाऱ्यांकडून घेतलेली रक्कम हवालाद्वारे स्वीकारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली होती. त्यांनी तेथून त्रिपाठी यांच्या नोकराला अटक केली. आरोपीने हवाला रक्कम उत्तर प्रदेशात स्वीकारल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने लखनऊ येथे पप्पूकुमार प्यारेलाल गौड (२७) याला अटक केली आहे. गौड हा उपायुक्त त्रिपाठी यांचा नोकर असून त्याने त्रिपाठीच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्याकडून हवालाद्वारे पैसे स्वीकारले होते. न्यायालयाने गौडला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वंगाटे याला १० मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याने अंगडिया व्यापाऱ्यांकडून सुमारे १९ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की,  वंगाटेने या खंडणीची काही रक्कम तत्कालीन विभागीय उपायुक्त त्रिपाठी  यांच्या सूचनेनुसार एका व्यक्तीला दिली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचा शोध घेतला असून त्याच्याकडून दीड लाख रुपये जप्त केले आहेत. त्रिपाठी यांच्या सूचनेनुसार  वंगाटे याने लखनऊमधील एका व्यक्तीला हवालाद्वारे पैसे पाठवले होते. या प्रकरणात पुरावा म्हणून गुन्हे गुप्तवार्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी हवाला व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि चलनी नोटा जप्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Angadia extortion case deputy commissioner of police saurabh tripathi servant arrested zws

ताज्या बातम्या