ठाणे महानगरपलिकेतर्फे कोपरी पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू असताना मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, ११ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार ११ मार्च रोजी सकाळी १० पर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील काही परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
या परिसरांत पाणी कपात होणार
मुंबई शहर विभाग
‘ए’: बीपीटी व नौदल परिसर
‘बी’ : संपूर्ण परिसर
‘ई’ : संपूर्ण परिसर
‘एफ-दक्षिण’ : संपूर्ण परिसर
‘एफ-उत्तर’ : संपूर्ण परिसर
पूर्व उपनगरे
‘टी’ : मुलूंड पूर्व व पश्चिम
‘एस’ : भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी पूर्व येथील परिसर
‘एन’ : विक्रोळी (पूर्व), घाटकोपर पूर्व व पश्चिम
‘एल’ : कुर्ला (पूर्व)
‘एम-पूर्व’ : संपूर्ण परिसर
‘एम-पश्चिम’ : संपूर्ण परिसर