इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिन याला अटक

मुंबईत झवेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीसकडून त्याचा शोध सुरू होता.

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हस्तक आणि मुंबईत २०११ साली झालेल्या १३/७ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी झैनुल अबेदिन याला मंगळवारी सकाळी महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
झैनुलविरोधात याआधीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मुंबईत झवेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीसकडून त्याचा शोध सुरू होता. याशिवाय, कर्नाटक आणि गुजरात राज्याचे पोलीसही झैनुलच्या मागावर होते. अखेर मंगळवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या माहितीनुसार, झैनुलवर मुंबईवरील १३/७ या साखळी बॉम्बस्फोटासाठी स्फोटके पुरविल्याचा आरोप आहे.
दरम्यान, झैनुलला अटक केल्यानंतर त्वरित न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने झैनुलला ६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ats arrested indian mujahheddin terrorist zainul abedin