कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कारासाठी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. ‘कोमसाप’तर्फे राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या कादंबरी स्पर्धेत ३७ स्पर्धक सहभागी झाले होते. ‘खेळघर’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून १५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या ७ ते ९ जानेवारी या कालावधीत दापोली येथे होणाऱ्या १४ व्या ‘कोमसाप’ साहित्य संमेलनात हा पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांना श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कार
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कारासाठी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. ‘कोमसाप’तर्फे राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या कादंबरी स्पर्धेत ३७ स्पर्धक सहभागी झाले होते.
First published on: 26-11-2012 at 02:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award to ravindra rukmini