‘कलादत्त प्रकाशन’तर्फे ग्रंथावर काम सुरू; ‘थ्रीडी इफेक्ट’मुळे जुना काळ जिवंत होणार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितोद्धारक नेते म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका चौकटीतच न बसवता त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा, विचारांचा आणि कार्याचा सर्वागाने वेध घेणारा ग्रंथ त्रिमितीय चित्र रूपात (थ्रीडी) पुण्याच्या ‘कलादत्त प्रकाशन’तर्फे साकारला जात आहे. ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाइन’ संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबेडकरांच्या ग्रंथासाठी त्रिमितीय चित्रे साकारली जाणार आहेत. त्यामुळे या ग्रंथातून तो काळ जिवंत होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  स्वातंत्र्य लढ्यापासून कसे दूर राहिले, आणि ते कसे केवळ दलितोद्धारक नेते होते ,या विषयावर अनेक वर्षांपासून मंथन सुरू आहे. आणि याच साच्यात आंबेडकरांना आजही बसवले जाते. मात्र हे सगळ्या विषयावर बोलताना अनेक विद्धान मंडळीकडूनही आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पलूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. एक उदाहरण घेऊन सांगायचे झाल्यास, मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी त्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डी. एस्सी, एम. ए.पीएच्. डी,  एल. एल. डी, बार-अ‍ॅट-लॉ या सारख्ये  उच्चत्तम पदवी शिक्षण घेतलेला विद्वान व्यक्ती समाजातून अंधश्रद्धा, अज्ञान, आणि अस्वच्छता मुळापासून उखडून जाव्यात, यासाठी आपले जीवन खर्ची घातलेले थोर संत गाडगेबाबा यांना गुरुस्थानी मानत, त्यांचे कीर्तन ऐकायला जात. अनेकदा राष्ट्रविषयक, समाजविषयक, धर्मविषयक, स्त्रीविषयक दृष्टिकोन, गौतम बुद्ध व बौद्ध धर्म अशा विविध विषयांवर चर्चा करत, त्यांचा सल्ला घेत.  या आणि या सारख्या असंख्य महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, अशाच बाबींचा वेध या ग्रंथात घेतला जाणार असल्याचे कलादत्त प्रकाशनाचे संचालक सुरेश नाशिककर यांनी सांगितले.

पुस्तकासह थ्रीडी चष्मा!

सध्या सृजन कॉलेज ऑफ डिझाइन संस्थेचे संचालक आणि लेखक संतोष रासकर आणि त्यांचे विद्याथ्र्यी या प्रकल्पावर काम करत आहेत. हाताने रेखाटलेल्या चित्रांना थ्रीडी इफेक्ट (त्रिमितीय परिणाम) देण्याचे काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाते. अ‍ॅनिमेटेड प्रकारातील ’ग्रे स्केल’मध्ये हे पुस्तक तयार केले जात असून हे इफेक्ट पाहण्यासाठी पुस्तकाबरोबर थ्रीडी चष्मा दिला जाईल. थ्रीडी’ आधारित हे आमचे दुसरे पुस्तक आहे. सर्वसाधारण या कामासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस असल्याचे नाशिककर यांनी सांगितले.