शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याचे काल (गुरूवार) रात्री उध्दव ठाकरे याच्यातर्फे सांगण्यात आले असले तरी आजही (शुक्रवार) मातोश्रीवर दिग्गजांची रीघ चालूच आहे. आज सकाळी योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेते सुरेश व विवेक ओबेरॉय यांनी “मातोश्री’वर बाळासाहेबांची भेट घेतली. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. पुणे स्थित प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनतर्फेही बाळासाहेबांसाठी प्रार्थना करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज (शुक्रवार) सकाळी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. आज सकाळी लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील परकार आणि त्यांची टीम मातोश्रीवर दाखल झाली होती. मात्र, साधारण आर्धातासानंतर माध्यमांशी काहीही न बोलताच ते स्रवजण निघून गेले.
बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा “मातोश्री’समोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. काल विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर वर्णी लावली होती.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
रामदेव बाबा बाळासाहेबांच्या भेटीला ‘मातोश्री’वर
आज सकाळी योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेते सुरेश व विवेक ओबेरॉय यांनी "मातोश्री'वर बाळासाहेबांची भेट घेतली. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे.

First published on: 16-11-2012 at 01:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramved visits matoshree