गेल्या दोन भागांमध्ये आपण रेल्वेच्या नियंत्रण कक्षाबद्दल माहिती घेतली होती. रेल्वेची बहुतांश सिग्नल यंत्रणा संगणकीय प्रणालीशी जोडलेली असल्याने एका नियंत्रण कक्षात बसून मुंबईच्या उपनगरीय भागात पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचे नियंत्रण करता येते. पण हे तंत्रज्ञान मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या बेस्टच्या गाडय़ांना कसे लागू पडणार..?

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

प्रत्येक शहराची एक विशिष्ट आठवण असते. सॅनफ्रान्सिस्को शहराला लागलेली आग किंवा त्या शहरात झालेला भूकंप असेल, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये उत्पात घडवणारी त्सुनामी असेल, न्यूयॉर्कमध्ये २००१ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या त्या दोन गगनचुंबी इमारती असतील.. मुंबईकडे अशा दोन-तीन आठवणी आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला भयानक गोदी स्फोट, २६/११चा दहशतवादी हल्ला आणि २००५ची जलापत्ती या काही आठवणी मुंबईकरांच्या मनावर कोरल्या आहेत. पकी गोदीतील स्फोटाची आठवण सांगणारे मुंबईत खूपच कमी लोक असतील. पण २००५च्या पुरात अडकलेले लाखो मुंबईकर या प्रसंगावर बोलते होतात. कंबरेपेक्षा जास्त उंचीपर्यंत तुंबलेले पाणी, रस्त्यातच अडकून बसलेल्या गाडय़ा, वाहून गेलेले रेल्वेरूळ. एक ना अनेक कथा!

पण या कथांच्या पाठोपाठ लगेचच ‘मुंबई कशी आणि किती झपाटय़ाने सावरली’ हेदेखील ऐकायला मिळते. २६ जुल २००५ला रस्त्यातच अडकून पडलेल्या बेस्टच्या गाडय़ा २८ जुलपासून पुन्हा रस्त्यावर धावायला लागल्या होत्या. त्याही वेळी मुंबईकरांना बेस्टच्या या तत्पर सेवेचे खूप अप्रूप वाटले होते. पण त्या मागे बेस्टच्या नियंत्रण कक्षाची प्रचंड मोठी मेहनत होती, हे खूपच कमी जणांना माहिती आहे. २६ जुल ही आणीबाणीची परिस्थिती झाली, पण दर दिवशीच बेस्टच्या ताफ्यातील साडेचार हजार गाडय़ा व्यवस्थित चालू राहण्यासाठी धडपड करणारा हा बेस्टचा नियंत्रण कक्ष आणि त्याचे कामकाज समजून घेण्यासारखे आहे.

महापालिकेच्या आपात्कालीन नियंत्रण कक्षाच्या तुलनेत हा कक्ष फार मोठा नाही. तरीही या कक्षातून चालणारे काम थक्क करणारे आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ५०० पेक्षा जास्त मार्गावर धावणाऱ्या बसगाडय़ांचे नियंत्रण कोणत्याही संगणकीय किंवा जीपीएस यंत्रणेशिवाय या नियंत्रण कक्षातून होत असते. मुंबईकरांच्या सेवेत या बसगाडय़ा अविरत चालू ठेवण्यासाठी शक्य होतील ते सर्व प्रयत्न या कक्षाकडून केले जातात. वडाळा येथील बेस्टच्या मोठय़ा आगारात असलेला हा नियंत्रण कक्ष तसा छोटेखानीच! या कक्षात कर्मचारी नियंत्रण कक्ष, बस वाहतूक नियंत्रण आणि प्रवासी हेल्पलाइन असे तीन छोटे कक्ष आहेत.

कर्मचारी नियंत्रण कक्षाद्वारे बेस्टच्या अधिकाऱ्यांना बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एका दूरध्वनीद्वारे मिळू शकते. धनादेशावरील सहा आकडी क्रमांकाप्रमाणे बेस्टच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक सहा आकडी क्रमांक दिला असतो. हा क्रमांक म्हणजे त्या कर्मचाऱ्याची ओळख असते. एखादा वाहक किंवा चालक कोणत्या आगारात, कोणत्या मार्गावर आणि कोणत्या गाडीवर डय़ुटीला आहे, हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना फार कष्ट करावे लागत नाहीत. या नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर पाचव्या मिनिटाला ती माहिती अधिकाऱ्यांना मिळते. त्यासाठी या कक्षात सर्व कर्मचाऱ्यांची नोंद क्रमाने असलेला संगणक आणि नोंदवही आहे. त्या संगणकात आणि त्या नोंदवहीतही प्रत्येक क्रमांकासमोरील माहिती अद्ययावत केली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला अपघात झाल्यास, वैद्यकीय मदतीची गरज असल्यास या कक्षाशी संपर्क साधून त्याने आपला सहा आकडी क्रमांक सांगितल्यावर त्याला ही मदत तातडीने मिळू शकते, अशी सोयही करण्यात आली आहे.

या कक्षाचे मुख्य काम म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवरील बसगाडय़ा धावत्या ठेवणे! त्यासाठी या कक्षात दोन नियंत्रक आणि अधिकारी असा सरंजाम वर्षांतील ३६५ दिवस अहोरात्र कार्यरत असतो. आता कल्पना करा, एखाद्या वेळी आपण जात असलेल्या बसला काही अपघात होतो. अशा वेळी वाहक म्हणजेच कंडक्टर सर्वप्रथम बस जवळच्या रुग्णालयात घेऊन दुखापत झालेल्या प्रवाशांना उपचार मिळेल, याकडे लक्ष देतो. त्यानंतर तो लगेच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतो. नियंत्रण कक्ष लगेचच अपघातस्थळाच्या जवळ असलेल्या आगारात संपर्क साधून तेथील अपघात अधिकारी, निरीक्षक आदींना घटनास्थळी पाठवले जाते. त्याचबरोबर संबंधित मार्गावर दुसरी बस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नियंत्रण कक्ष पार पाडतो आणि वाहतूक सुरू ठेवतो.

असा अपघात घडल्यानंतर कक्षाचे दुसरे काम असते ते म्हणजे मुख्यालयात या प्रकरणाची माहिती देणे! अपघातासंबंधी इत्थंभूत माहिती मिळाल्याखेरीज हा नियंत्रण कक्ष कोणत्याही प्रकारची माहिती पुढे देत नाही. ही माहिती घेण्यासाठी बस चालक-वाहक, संबंधित विभागातील पोलीस स्टेशन आदींशी संपर्क साधला जातो. आता आणखी एक प्रकार पाहू या! मुंबईत एखाद्या ठिकाणी आग लागते. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस यांच्यासह बेस्टच्या विद्युत यंत्रणेच्या गाडय़ाही दाखल झालेल्या असतात. एखाद्या वेळी इमारतीचा काही भाग रस्त्यावर कोसळतो. कधी एखादे झाड रस्त्यावर पडते. अशा वेळी काम करण्यासाठी पालिका, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या घटनास्थळाच्या आसपासचे रस्ते बंद केले जातात. त्यामुळे घटनास्थळाकडील रस्त्यावरील वाहतूक बंद होऊन मदतकार्य सुरळीत पार पाडता येते. मात्र त्यामुळे बेस्टच्या अनेक गाडय़ा दुसऱ्या मार्गाने वळवायला लागतात. याबाबतच निर्णयही याच नियंत्रण कक्षातून होतो. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस यांच्याशी सल्लामसलत करून काही मिनिटांमध्ये हा निर्णय घेतला जातो.

या कक्षातील तिसरा आणि अगदी चार-पाच वर्षांपूर्वीच सुरू झालेला भाग म्हणजे प्रवासी हेल्पलाइन कक्ष! हा वास्तविक प्रवाशांच्या मदतीसाठीचा कक्ष आहे. म्हणजे एखादा प्रवासी एखाद्या थांब्यावर उभा असेल आणि त्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी कोणती बस पकडायची, हे माहीत नसेल, तर तो या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन क्रमांक १८००२२७५५० यावर संपर्क साधू शकतो. त्याला काही जुजबी प्रश्न विचारून त्याच्या शंकेचे निरसन केले जाते. आता अनेकदा प्रवासी या क्रमांकाचा वापर तक्रार करण्यासाठीही करतात. अशा वेळी या प्रवाशांची तक्रार, त्यांचा संपर्क क्रमांक आदी गोष्टी नोंदवल्या जातात. ही तक्रार संबंधित आगाराकडे पाठवली जाते. म्हणजे एखाद्या वाहकाने अरेरावीचे वर्तन केले आणि प्रवाशाने त्याची तक्रार केली, तर तो वाहक कार्यरत असलेल्या आगाराकडे ही तक्रार वर्ग केली जाते. या प्रकरणाची चौकशी होते त्या वेळी संबंधित वाहकाबरोबर तक्रारदार प्रवाशाने सुनावणीसाठी हजर राहणे अपेक्षित असते. मात्र बहुतांश प्रवासी हा प्रकार टाळत ‘आम्ही तक्रार नोंदवली आहे, आता आमची काय गरज’, अशी भूमिका घेत असल्याचे निदर्शनास येते. तरीही या नियंत्रण कक्षातील या विभागाद्वारे प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्याचे काम केले जाते.

मगाशी २६ जुलचा उल्लेख आला. त्या दिवशी कुर्ला आगारातील इंधनाच्या टाक्यांमध्येही पाणी गेले होते. दुसऱ्या दिवशी कुर्ला आगारातील गाडय़ा इतर आगारांमध्ये पाठवून तेथून इंधन भरून मग त्या चालवण्यात आल्या. त्याचा निर्णयही नियंत्रण कक्षातून घेतला गेला होता. बेस्टच्या गाडय़ा चालत्या राहण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करणाऱ्या या कक्षाचे काम खरोखरच ‘बेस्ट’ आहे.

प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक १८००२२७५५०

@rohantillu

Email – tohan.tillu@expressindia.com