मुंबईत भाषा भवन उभारण्याच्या निर्णयास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. धोबी तलाव परिसरातील रंगभवन येथील खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या इमारतीत मराठी भाषा भवन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळांची कार्यालये असणार आहेत. एक सुसज्ज ग्रंथालयही भवनामध्ये असेल. याशिवाय सिंधी, उर्दू, गुजराती अकादमीची कार्यालये देखील या भाषा भवनामध्ये असतील.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
मुंबईत भाषा भवन बांधण्यास मान्यता
मुंबईत भाषा भवन उभारण्याच्या निर्णयास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
First published on: 10-07-2013 at 08:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhasha bhavan in mumbai