भावना गवळी ‘ईडी’च्या चौकशीस गैरहजर

गवळी यांच्यावतीने वकिलांनी ईडी कार्यालयात येऊन १५  दिवसांची मुदत मागितली.

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी या सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत असलेल्या चौकशीसाठी बुधवारी वैद्यकीय कारणामुळे अनुपस्थित राहिल्या.  गवळी यांच्यावतीने वकिलांनी ईडी कार्यालयात येऊन १५  दिवसांची मुदत मागितली.  गवळी यांना चिकुनगुनिया झाल्याचा अहवाल सादर करून आणखी १५ दिवसांचा कालावधी ईडीकडे मागितला. यापूर्वी गवळी यांना दोनवेळा ईडीने समन्स बजावले आहे. गवळी यांनी सईद खान व इतर साथीदारांच्या मदतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ही ट्रस्ट कंपनी कायदा कलम ८ च्या अंतर्गत कंपनीत रुपांतरीत केली. त्यात खोट्या कागदपत्रांचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या तपासानुसार याप्रकरणात बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhavana gawali absent from ed inquiry akp

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !