मुंबई : अभिनयाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात झोकून दिलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या नेटफ्लिक्सवरील ‘भक्षक’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी जगभरातून तिचं कौतुक होत आहे. नेटफ्लिक्सवरील इंग्रजीतेतर विभागातील पहिल्या टॉप पाच चित्रपटांमध्ये ‘भक्षक’चा समावेश झाला आहे. सध्या यशाच्या आनंदात न्हाऊन निघालेल्या भूमीसाठी आणखी एक खास कौतुकाची गोष्ट ठरली आहे ते म्हणजे आईकडून मिळालेलं सोन्याचं नाणं.

भूमीचं ‘भक्षक’ चित्रपटातील काम आवडल्यामुळे तिच्या आईने तिला सोन्याचं नाणं बक्षीस म्हणून दिलं आहे. आईकडून मिळालेलं सोन्याचं नाणं हा आपल्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचं भूमी म्हणते. या सोन्याच्या नाण्यामागचा किस्साही तिने सांगितला. ‘दम लगा के हैशा’ हा भूमीचा पदार्पणाचा चित्रपट. ‘हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी खास शो ठेवण्यात आला होता. तो पाहून घरी परतल्यानंतर आईने मला पहिलं सोन्याचं नाणं दिलं. तिला माझा अभिनय आवडला होता. मी तिला मिठी मारली आणि रडले. त्या दिवसापासून मी तिच्याकडून माझ्या कामासाठी सोन्याचं नाणं कधी मिळणार याची वाट पाहात असते’, असं भूमीने सांगितलं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून दोन महिलांची पाच लाखांची फसवणूक

‘भक्षक’ पाहून आई कशी भारावून गेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिच्याकडे पाहून अर्थातच मलाही रडू आलं. मला माझ्या ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाच्या वेळची आठवण झाली. मी माझ्या आईला इतकं भारावलेलं कधी पाहिलं नव्हतं. घरी परतताना आम्ही दोघी अजिबात एकमेकींशी बोललो नाही. मला वाटतं, तिने जे पाहिलं ते तिच्या मनाला खोलवर स्पर्श करून गेलं होतं, अशी आठवण भूमीने सांगितली.

हेही वाचा – बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत

याआधी आईने ‘सांड की आँख’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘सोनचिरिया’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘बाला’, ‘शुभ मंगल सावधान’,‘बधाई दो’ या चित्रपटातील आपलं काम आवडलं म्हणून सोन्याचं नाणं भेट दिलं होतं, असं तिने सांगितलं. चित्रपटाशिवायही तिने केलेल्या काही चांगल्या कामांसाठी आईकडून सोनेरी कौतुक झालं आहे. त्यामुळे आईकडून मिळणारी ही सोनेरी भेट आता चांगलं काम करण्यासाठीचा प्रेरणस्रोतच ठरला आहे, असं तिने सांगितलं.

Story img Loader