मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची करोना चाचणी नकारात्मक आल्याने त्यांनी गुरुवारी लगेच कामकाजास सुरुवात केली. राज्यसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी त्यांनी भाजप नेत्यांच्या बैठकाही घेतल्या. भाजपचे राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्वनी वैष्णव यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, अ‍ॅड. आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.भाजप, मित्रपक्ष आणि काही अपक्ष आमदार ताज विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास असून फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा तेथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली.