मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तन होत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर हा जनसामान्यांचा रोगनिदान व उपचारावरील खर्च कमी करावा, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटलतर्फे आयोजित ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम प्रज्ञेचा वापर वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारा ठरेल. कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे. डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये.तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपाल म्हणाले.

हेही वाचा…‘जेल का जवाब वोट से’, महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी फेलो दिवंगत डॉ. बी. के. गोयल व डॉ. एल. एच. हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. केवल तलवार, डॉ. पी. व्ही. देसाई, डॉ. बी. एस. सिंघल, डॉ. सरोज गोपाल, डॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजा, डॉ. नादीर भरुचा, डॉ. सुनील पंड्या, डॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले.