scorecardresearch

भाजप आमदार साटम यांच्या अटकेची मागणी

भाजपच्या नेत्यांनी मुंबईत गदारोळ करून जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : लोकप्रतिनिधीने खोटय़ा माहितीचा प्रचार व प्रसार करणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे भाजप आमदार अमित साटम यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.

मालाड पश्चिम येथील एका मैदानाला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी टिपू सुलतान हे नाव दिले. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी मुंबईत गदारोळ करून जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी एम-पूर्व विभागातील एका रस्त्याला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव एम-पूर्व प्रभाग समितीत २६ जुलै २०१३ रोजी मांडला होता. तेथे तो मंजूर झाल्यानंतर २३ डिसेंबर २०१३ साली मुंबई महानगरपालिकेच्या सभेमध्येही तो प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास सूचक म्हणून यशोधर फणसे आणि अनुमोदक म्हणून भाजपचे आताचे आमदार व त्यावेळचे नगरसेवक अमित साटम यांनी दिले होते असा दावा जगताप यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla amit satam should be arrested say mumbai congress president bhai jagtap zws

ताज्या बातम्या