भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असं वक्तव्य केलं. ते बुधवारी (१ मार्च) राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना सभागृहात बोलत होते.

राऊतांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, “आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलेलं.”

Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान

“बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही”

“बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं संजय राऊतांनी लिहिलं होतं. राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले, “त्यांच्यात हिंमत नसून, ते…”

“संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”

“त्यांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असं वक्तव्य राणेंनी केलं.