मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने पंकजा मुंडे व त्यांचे समर्थक नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेच माझे नेते असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळला होता व धर्मयुद्ध टाळत असल्याचे सांगून आपली नाराजीही व्यक्त केली होती. या पाश्र्वाभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वरळी कार्यालयात मंगळवारी भेट घेतली होती. पंकजा मुंडे नाराज नसल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.