मुंबई  : भाजपचे नेते मोहित कंबोज राहत असलेल्या इमारतीची व त्यांच्या घराची पालिकेच्या पथकाने बुधवारी पाहणी केली. सांताक्रूझ येथील एस. व्ही. पी. मार्गावरील चौदा मजली खुशी प्राइड इमारतीत दुपारी दोन वाजल्यानंतर पालिकेचे पथक पाहणीसाठी गेले होते. कंबोज यांना सोमवारी पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाने नोटीस पाठवली होती. मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ४८८ अंतर्गत ही नोटीस देण्यात आली होती. सांताक्रूझमध्ये ते राहात असलेल्या इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्याबाबत पूर्वसूचना या नोटिशीतून देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी दुपारच्या सुमारास पालिकेच्या पथकाने इमारतीत प्रवेश केला. चौदा मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्याची पाहणी पथकाने केल्याचे समजते. या पाहणीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.  कंबोज यांनी याबाबत समाजमाध्यमांवर माहिती दिली असून  पालिकेच्या पथकाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.  पालिकेच्या पथकाने कंबोज राहत असलेल्या इमारतीची पाहणी केली.

अनधिकृत बांधकाम? या वेळी मूळ आराखडय़ात बदल करून अनधिकृत बांधकाम केले असल्याचे पथकाला आढळून आले आहे. पाहणीचा अहवाल तयार करून लवकरच पालिका नियमानुसार नोटीस पाठवण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीत कंबोज यांच्या नावे एकापेक्षा अनेक सदनिका आहेत असे समजते.  इमारतीच्या सर्व मजल्यांवर पालिकेच्या पथकाने पाहणी केली असून ज्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्या मजल्यांना नोटीस धाडण्यात येणार आहे. या इमारतीत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्यावरून ही पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका