scorecardresearch

‘धनुष्यबाण चोरले, तरी प्रभू श्रीरामांचा मलाच आशीर्वाद’

शिवसेनेचे धनुष्यबाण चोरले, तरी प्रभू श्रीरामांचा मलाच आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.

uddhav thackerays rally
उध्दव ठाकरे (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चोरले, तरी प्रभू श्रीरामांचा मलाच आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले. माझ्या भात्यात असे असंख्य बाण आहेत, ब्रह्मास्त्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

रामटेकपासून ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानापर्यंत युवा परिवर्तन संघटनेच्या काही तरुणांनी यात्रा काढली होती. त्यांचे निवेदन स्वीकारून ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी ‘मातोश्री’ परिसरात फलकबाजी केली आहे. ‘जो प्रभू रामांचा नाही, तो काही कामाचा नाही,’ असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे समर्थक कार्यकर्ते चिडले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या