मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर कारचा विचित्र अपघात, एक ठार

भरधाव वेगात असलेल्या कारमधील चालकाला झोप अनावर झाली आणि…

(सोमाटणे फाटा येथे हा अपघात झाला)
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर एका कारचा विचित्र अपघात होऊन एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तिघे जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमधील कुटुंब हे कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने जात होते, मात्र, सोमाटणे फाटा येथे भरधाव वेगात असलेल्या कारमधील चालकाला झोप अनावर झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेली स्टीलची सुरक्षा पट्टी भेदून आरपार गेली. केवळ नशीब बलवत्तर असल्याने यात सर्व बचावले आहेत. मृताचे नाव अमोल पाटील असे आहे. दोघा जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,कोल्हापूरवरून पाटील कुटुंब हे मुंबईच्या दिशेने जात असताना सोमाटणे फाटा येथे कार चालक सूर्याजी कृष्णा भोंदे यांना झोप अनावर झाली आणि अपघात झाला. काही कळायच्या आत गाडी सुरक्षा पट्टी भेदून आरपार गेली. या भीषण आणि विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीमंत कृष्णा भोंदे,प्रकाश गोविंद वरगडे,आणि चालक सूर्याजी कृष्णा भोंदे,अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याविषयी अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Car accident on mumbai pune expressway