‘मनोरा’ आमदार निवासातील सतीश पाटील यांच्या खोलीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील हे ‘मनोरा’ आमदार निवासातील ११२ नंबर खोलीत राहत आहेत. छताचा भाग जेव्हा कोसळले त्यावेळी खोलीत कोणीही नव्हते. खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  ‘मनोरा’ आमदार निवास इमारतीमधील छत कोसळल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच यावेळी आमदारांच्या निवासाचा प्रश्न सुटत नसेल तर सतरंजी आणून सभागृहात झोपण्याची परवानगी द्या, अशी मागणी आमदार सतीश पाटील यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार निवासाची अवस्था बिकट आहे. बांधकाम ठिक नाही. नवीन बांधकाम करण्याची गरज असून, आमदारांच्या भावना योग्य आहेत. मुंबईतील म्हाडाच्या काही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तिथे आमदारांना जागा देण्यावर विचार करण्यात येईल. आमदारांना दुसरीकडे भाडेतत्वार राहण्याची व्यवस्था करणे शक्य असेल तर यावरही विचार करु. आजच त्यासाठी बैठक बोलावण्यात येईल. दक्षिण मुंबई परिसरातील नरिमन पॉईंटच्या समुद्रकिनारी ‘मनोरा’ आमदार निवासाची इमारत आहे. २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासाच्या या इमारतीमधील अनेक खोल्या निष्कृष्ट दर्जाच्या असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. सदनिकांमधील अनेक छताचा काही भाग यापूर्वीही कोसळला असून, काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले आहे. इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल यापूर्वी सादर करण्यात आला आहे.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी