scorecardresearch

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बुधवारी सकाळी परळ- दादर या स्थानकादरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेला.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
संग्रहित छायाचित्र

परळ- दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

बुधवारी सकाळी परळ- दादर या स्थानकादरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेला. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. मात्र, याचा फटका प्रवाशांना बसला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यादेखील उशिराने धावण्याची शक्यता आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देखील कुर्ला- सायन (शीव) दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या