मुंबई.: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या आणि जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन मार्गिकेमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन मार्गिकांतून वाहतूक करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्रुतगती मार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीतील हा बदल करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आली आहे. या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in khopoli bypass on mumbai pune expressway from monday mumbai print news amy
First published on: 27-02-2024 at 21:31 IST