मुख्यमंत्री ठाकरे आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील.

मुंबई : तौक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर जातील. तेथून मोटारीने वायरी, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे जाऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतील. त्यानंतर रत्नागिरीला परत येऊन  पुन्हा मुंबईला येतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chief minister uddhav thackeray on a visit to ratnagiri sindhudurg today akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या