Premium

काँग्रेसची लोकसभा जागावाटपाची पूर्वतयारी; शनिवारपासून विभागवार आढावा बैठका

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने येत्या शनिवारपासून विभागवार बैठकांचे आयोजन केले आहे.

congress partyCongress preparations for Lok Sabha seat allocation , Congress ,
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता )

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने येत्या शनिवारपासून विभागवार बैठकांचे आयोजन केले आहे. मुंबई वगळून राज्यातील इतर ४२ लोकसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत. देशपातळीवर काँग्रेसप्रणीत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करण्याचे ठरले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress preparations for lok sabha seat allocationamy

First published on: 05-10-2023 at 02:56 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा