मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग – युनिट ३ चे प्रमुख अरविंद सावंत यांचा मुलगा तेजस सावंत (वय २१ वर्षे) याने, सावंत यांच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज (बुधवार) सकाळी सात वाजता विक्रोळी येथे सावंत यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. एक राऊंड फायरिंगनंतर तेजसला जवळच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येप्रकरणी तेजसच्या खोलीतून कुठल्याही प्रकारची चिठ्ठी मिळालेली नाही. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी, सावंत हे काही कारणावरून तेजसला ओरडले होते आणि त्यानंतर हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अरविंद सावंत यापूर्वी एटीएस मध्ये कार्यरत होते.