scorecardresearch

शीना बोरा हत्याकांड : राहुल मुखर्जी याची उलटतपासणी

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सध्या शीना बोरा हत्येशी संबंधित खटला सुरू आहे.

शीना बोरा हत्याकांड : राहुल मुखर्जी याची उलटतपासणी
राहुल मुखर्जी

मुंबई :  शीना बोरा आणि माझे रक्ताचे नाते नव्हते आणि आम्ही परस्पर संमतीने नातेसंबंधांत होतो, असे शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी याने उलटतपासणीदरम्यान विशेष सीबीआय न्यायालयात सांगितले. 

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सध्या शीना बोरा हत्येशी संबंधित खटला सुरू आहे. याप्रकरणी शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी याची सोमवारी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. राहुल हा इंद्राणीचा तिसरा पती पीटर मुखर्जी याचा मुलगा आहे. पीटर मुखर्जीही याप्रकरणी आरोपी असून तो आणि इंद्राणी सध्या जामिनावर बाहेर आहेत. शीना ही सावत्र आई इंद्राणीची मुलगी आहे हे समजल्यानंतरही तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले, यात नैतिकदृष्टय़ा काही गैर वाटले नाही का, अशी विचारणा इंद्राणीचे वकील रणजीत सांगळे यांनी राहुल याला केली. त्यावर शीना आणि माझे रक्ताचे नाते नव्हते, त्यामुळे तिच्यासोबतच्या संबंधांत गैर काय, असा प्रतिप्रश्न राहुल याने केला. तसेच आपण व शीना परस्पर सहमतीने नातेसंबंधात होतो, असेही त्याने न्यायालयाला सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या