ईव्हीएमचा वापर भाजपाकडून अतिशय धूर्तपणे केला जात असून यात कोणताही घोटाळा नाही, हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुका विरोधकांना जिंकू देतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असून हा मूर्खपणा असल्याचं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिंदे सरकारबद्दलचं ‘ते’ वक्तव्य संजय राऊतांना भोवलं, गुन्हा दाखल; नेमकं काय म्हणाले होते?

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जितेंद्र आव्हाड जे बोलत आहेत, त्यापेक्षा मोठा मूर्खपणा कोणताही असू शकत नाही. जर ईव्हीएमचा वापर करायचाच असता, तर भाजपाने कर्नाटक निवडणुकीदरम्यानही केला असता. खरं तर काही लोकांना मूर्खासारखं बोलायची सवय झाली आहे. आव्हाडांनी आता डोकं वापरून बोलावं, हा माझा त्यांना सल्ला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरून राज ठाकरेंची टीका, भाजपाचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “घरात बसून…”

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर येथे भाजपाने ईव्हीएमचा वापर केला नाही का, असा प्रश्न काही नेटकऱ्यांकडून विचारण्यात आला होता. या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी आज सकाळी एक व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

ईव्हीएमचा वापर भाजपाकडून अतिशय धूर्तपणे केला जातो. ईव्हीएममध्ये कोणताही घोटाळा नाही, हे लोकांना दाखवून देण्यासाठी ते राज्यांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना जिंकू देतात. मुळात भाजपाला केवळ गुजरात, उत्तर प्रदेश आणि लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे केवळ या तीन ठिकाणीच भाजपाकडून ईव्हीएमचा वापर केला जातो आणि म्हणूनच विरोधकांनी किती राज्यांच्या निवडणुका जिंकल्या तरी लोकसभेत त्याचा परिणाम दिसून येत नाही, असे ते म्हणाले.