scorecardresearch

पुष्पक बुलियन प्रकरण : ईडीची शोधमोहीम

अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या चतुर्वेदी यांनी पुढे ही रक्कम बनावट कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडचा वापर केला.

मुंबई : नोटाबंदीच्या काळात २०१७ मध्ये बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा व्यवहारात आणणारा कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याच्या तपासासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शोध मोहीम राबवली. तो परदेशात गेल्याच्या माहितीचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मेसर्स पुष्पक रिअल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली २० कोटी दोन लाख रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना दिले होते. त्यासाठी हा व्यवहार विविध जोडलेल्या तसेच न जोडलेल्या घटकांच्या माध्यमातून करण्यात आला.

अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या चतुर्वेदी यांनी पुढे ही रक्कम बनावट कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडचा वापर केला. या कंपनीने श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त विनातारण कर्ज दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा.लि.चे मालक आहेत.

 याप्रकरणी ईडी सध्या चतुर्वेदीचा शोध घेत आहे. ईडीने यापूर्वीही चतुर्वेदीला समन्स पाठवले होते, पण तो ईडी पुढे उपस्थित राहिला नव्हता. याप्रकरणी ईडीने मथुरा येथे राबवलेल्या शोधमोहिमेतही तो सापडला नाही. चतुर्वेदीने बनावट कंपन्यांच्या साहाय्याने आणखी काही व्यक्तींचा काळा पैसा व्यवहारात आणल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी लोअर परळ परिसरातही ईडीच्या पथकाने तपास केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed start search operation for nandkishor chaturvedi in pushpak bullian zws

ताज्या बातम्या