अभिनेता शशांक केतकर याच्या साखरपुड्याच्या बातमीची पोस्ट ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली होती. मात्र, काही अज्ञात खोडसाळ लोकांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या बातमीच्या हेडिंगचा स्क्रिनशॉट घेऊन त्यामध्ये फेरफार करून चुकीच्या हेडिंगसह तो फोटो व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया हॅंडल्सवर व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शशांक केतकरची बातमी तयार करताना किंवा ‘लोकसत्ता’च्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना कोणतीही चूक झालेली नसून चुकीचा फोटो व्हायरल करून ‘लोकसत्ता’ला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. ‘लोकसत्ता’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सदर ‘व्हायरल फोटो’ची मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास करण्यास सुरुवात केली आहे. सर्व सुजाण वाचकांनी या पोस्टकडे दुर्लक्ष करावे आणि चुकीची पोस्ट इतर ठिकाणी फॉरवर्ड किंवा पोस्ट करू नये, ही नम्र विनंती.

लोकसत्ताची मूळ पोस्ट :

Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

shashank-original-post