गेले दोन वर्ष पोटच्या १८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांबरोबर, भावानेही दोन महिन्यापासून आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना डोंबिवलीत शुक्रवारी रात्री उघडकीला आली. वडील आणि मुलाला रात्रीच पोलिसांनी अटक केली. गेल्या महिनाभरात डोंबिवली परिसरातील ही १९ वी घटना आहे.
महेश खिमजी पासड (५०) हे मुलीचे वडील तर हार्दिक (२०) हा तिचा सख्खा भाऊ आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुलीची आई वडिलांपासून विभक्त झाली असून नुकताच त्यांचा घटस्फोटही झाला. तेव्हापासून महेश याने आपले हातपाय चेपण्याच्या बहाण्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. बापाचे हे धंदे नजरेस आल्यावर मुलाने या गैरप्रकाराविरूद्ध आवाज उठविण्याऐवजी त्यानेही बहिणीवर गेल्या दोन महिन्यांपासून बलात्कार करणे सुरू केले होते. या उपद्रव मुल्यापासून मुलगी खूप त्रस्त होती. पण सांगायचे कोणाला या विवंचनेत ती होती, असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी ती या उपद्रवाला कंटाळून मुंबईत निघून गेली. रात्री कोठे राहायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने ती पुन्हा रात्रीच्या लोकलने डोंबिवलीला परतली. रेल्वे स्थानकावर ती बसून रडत असतानाच तिच्या काही मैत्रिणींनी तिला हटकले. मैत्रिणींसमोर तिने आपला दोन वर्षांचा त्रास उघड केला. एका मैत्रिणीची आई समाजसेविका असल्याने तिने थेट मुलीसह रामनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे महेश आणि हार्दिकवर गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस आयुक्त राजन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे.
या आरोपींबरोबर गेले महिनाभर बलात्कार, खून खटल्यात अडकलेल्या आरोपींना फाशीसारख्या शिक्षा देण्याची मागणी शहरातील नागरिक, स्वयंसेवी संघटनांकडून करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुलासह वडिलांचा डोंबिवलीत पोटच्या मुलीवर बलात्कार
गेले दोन वर्ष पोटच्या १८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांबरोबर, भावानेही दोन महिन्यापासून आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याची दुर्देवी घटना डोंबिवलीत शुक्रवारी रात्री उघडकीला आली. वडील आणि मुलाला रात्रीच पोलिसांनी अटक केली.
First published on: 30-12-2012 at 03:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and son raped daughter