मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवास आता आणखी जलद होणार आह़े ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू होत आह़े

‘सीएसएमटी’मधून सुटणाऱ्या व त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने वेळापत्रक विस्कळीत होत होते. लोकल, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा वेग मंदावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. आता हा प्रवास विनाअडथळा होणार आहे.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

ठाणे-दिवा स्थानकादरम्यान एक्स्प्रेस गाडय़ांसाठी संपूर्ण पाचवी व सहावी मार्गिका उपलब्ध होत आहे. यातील सहाव्या मार्गिकेसाठी ७२ तासांचा ब्लॉक सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. यात मोठय़ा प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आली. २३ जानेवारीला १४ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर पाचवी मार्गिका सुरु झाली होती.

मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी सध्या ठाणे ते कुर्लापर्यंत आणि दिवा ते कल्याणपर्यंत पाचवी, सहावी स्वतंत्र मार्गिका आहे. ठाणे ते दिवा दरम्यान ही मार्गिका नसल्याने जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेसही जात होत्या. ठाणे ते दिवादरम्यान अप व डाऊन जलद मार्गिकेवर मेल, एक्स्प्रेस किंवा लोकल गाडीला प्राधान्य देताना यातील काही सेवांना अर्धा ते पाऊण तास थांबवलेही जात होते. यामुळे काही वेळा जलद लोकलबरोबरच मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत होता. त्यावर कायमस्वरुपी तोडगा म्हणून ‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वेने ठाणे ते दिवादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता. २००८-०९ साली या मार्गिकेला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, रुळांजवळील अतिक्रमण, तांत्रिक अडचणी इत्यादींमुळे प्रकल्पाचे काम लांबले आणि सुरुवातीच्या पाच वर्षांनंतर सेवेत येणे अपेक्षित असलेली मार्गिका उपलब्ध होण्यासाठी २०२२ साल उजाडले.

पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरुप देण्यासाठी ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. यामध्ये ५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत होते. याआधी १९ डिसेंबर २०२१ मध्ये १८ तासांचा, त्यानंतर २ जानेवारी २०२२ ला २४ तासांचा, ८ जानेवारीला ३६ तासांचा, २३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेदरम्यान आठ पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. तर १.४० किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, २१ लहान पुलांची उभारणी केली असून १७० मीटर लांबीचा बोगदा तयार केला आहे. या सर्व कामांची सोमवारी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केली.

काय फायदा?

० कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल.

० पारसिक बोगद्यातून जाणारी मार्गिका मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी असेल, तर मुंब्रा स्थानकाजवळच उभारलेल्या १.४० किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल व त्यामार्गे लोकलसाठी मार्ग करून देण्यात आला आहे.

० लोकल व मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान व त्यापुढे अप व डाऊन मार्गावर रखडपट्टी थांबेल.

लोकल फेऱ्यांत लवकरच वाढ

मेल, एक्स्प्रेससाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सेवेत येणार असल्याने लोकलचे वेळापत्रकही सुधारेल़  त्यामुळे टप्प्याटप्याने सुमारे ८० लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आह़े  या लोकल वातानुकूलित असतील, असे मध्य रेल्वेने आधीच स्पष्ट केले होते. परंतु, वातानुकूलित लोकल गाडय़ांना प्रतिसाद कमी असल्याने सामान्य लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान दोन मार्गिका मंगळवारपासून सेवेत दाखल होतील. ७२ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आल़े  यामुळे मेल, एक्स्प्रेसबरोबरच लोकलचेही वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल.  -रवी अग्रवाल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी