MLA Yogesh Kadam Car Accident: माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आमदार कदम या अपघातात बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला. यानंतर योगेश कदम यांनी अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

योगेश कदम म्हणाले, “मी मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.”

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Lok Sabha Election 2024 Roadshow of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Pune
‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा

“मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही”

“आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आज आम्ही एका मोठ्या अपघातातून वाचलो आहोत. मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही,” अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

व्हिडीओ पाहा :

“पुढील सर्व नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच मी करणार”

“पुढील सर्व नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच मी करणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या,” असंही आमदार कदम यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Rishabh Pant Accident: कोणाच्या पायात बसवला रॉड, तर कोणी गमावला डोळा; ‘या’ क्रिकेटपटूंनी अपघातानंतरही केले दमदार पुनरागमन

आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.