वेबकॅमवर चॅटींग करता करता पतीशी भांडण झाल्याने निराश झालेल्या विवाहित तरुणीने वेबकॅमसमोरच आत्महत्या केली. शोभना सुरती (२७) असे या तरुणीचे नाव आहे. विलेपार्ले येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडळी. शोभना सुरती ही तरुणी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती.  स्वप्नील सुर्वे (२८) याच्याशी तिने प्रेमसंबध होते. मात्र सुर्वेच्या कुटुंबियांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे या दोघांना कुणालाही न सांगता सहा महिन्यांपुर्वी नोंदणीपद्धतीने विवाह केला. परंतु स्वप्नीलच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध करत तिच्याकडे २५ लाखांचा हुंडा मागितला तेव्हापासून शोभना आपल्या माहेरी रहात होती.
शोभनाचे आई वडील गावी गेल्याने ती घरी एकटीच होती. बुधवारी संध्याकाळी लॅपटॉपवर इंटरनेटद्वारे वेबकॅमवर स्वप्नीलशी चॅटींग करत होती. त्यावेळी चॅटींग करत असतांना तिचे स्वप्नीलशी भांडण झाले. लग्न करूनही स्वप्नीलच्या घरची मंडळी तिचा स्वीकार करत नव्हते. त्या मुद्दय़ावरु त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. या भांडणातच तिने स्वप्नीलला आत्महत्या करण्याची धमकी दिली. रागाच्या भरात ती हे बोलत असेल असे स्वप्नीलला वाटले. परंतु शोभनाने वेबकॅमसमोरच ओढणी काढून पंख्याला अडकवून आत्महत्येस सुरवात केली.
यावेळी वेबकॅम सुरू होता आणि स्वप्नील ते बघत होता. त्याने तात्काळ शोभनाची बहिण भाविका हिला फोन करून हा प्रकार सांगितला. भाविका आणि इतर नातेवाईक घरी पोहोचेपर्यंत शोभनाने आत्महत्या केली. पोलिसांनी शोभनाचा लॅपटॉप, वेबकॅम जप्त केले आहे. सुरवातीला स्वप्नीलने शोभना आपली प्रेयसी असल्याचे  पोलिसांना सांगितले होते.
परंतु सुरतला गेलेले शोभनाचे आई-वडिल मुंबईला परतले आणि त्यांनी गुरुवारी सकाळी या दोघांच्या लग्नाची कागदपत्रे पोलिसांना सादर केली. २५ लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप शोभनाच्या आई वडिलांनी केला. त्यावरून जुहू पोलिसांनी स्वप्नील आणि आणि त्याच्या आईच्या विरोधात हुंडा मागितल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना अद्याप अटक केली नसल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भगत यांनी सांगितले.
इंटरनेटद्वारे वेबकॅमवर स्वप्नीलशी चॅटींग करत होती. त्यावेळी चॅटींग करत असतांना तिचे स्वप्नीलशी भांडण झाले. लग्न करूनही स्वप्नीलच्या घरची मंडळी तिचा स्विकार करत नव्हते. त्या मुद्दय़ावरु त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. या भांडणातच तिने स्वप्नीलला आत्महत्या करण्याची धमकी दिली.