मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवार १५ जानेवारी रोजी प्रा. सुहास सुखात्मे आणि संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता होणार आहे. या अविधवेशनात परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ‘भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांचे योगदान आणि आव्हाने’ या पहिल्या परिसंवादात प्रा. मनमोहन शर्मा, डॉ. बी. एन. जगताप, डॉ. सी. डी. माई, डॉ. वसंता मुथ्थुस्वामी, डॉ. अनिरुद्ध पंडित, डॉ. विवेक रानडे आणि प्रा. मिलिंद सोहनी हे सहभागी होणार आहेत. तर ‘विज्ञान प्रसाद आणि आम्ही’ या दुसऱ्या परिसंवादात प्रा. जयंत नारळीकर, डॉ. आनंद कर्वे, जयंत एरंडे, अ. पां. देशपांडे आणि डॉ. मानसी राजाध्यक्ष सहभागी होणार आहेत. हे परिसंवाद शनिवार १६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० पासून पार पडणार आहेत. तर रविवार १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विज्ञान अर्थकारण आणि संस्कृती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये प्रा. ज्येष्ठराज जोशी, प्रा. द. ना. धनागरे, गिरीश कुबेर, प्रदीप लोखंडे सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध कार्यक्रमही या तीन दिवसांत पार पडणार आहेत. अधिक माहितीसाठी परिषदेच्या http://www.mavipamumbai.org या संकेतस्थळावर भेट द्या.